Thursday, 25 November 2021

 शिक्षक


तुम्ही होतात म्हणून शिक्षित झालो 

कधी छडीचा मार खाल्ला

 आणि तुम्ही वटारलेल्या डोळ्यात अख्खे पुस्तक वाचिले


तुम्ही होतात म्हणून

वर्ण शिकले

तुम्ही होतात म्हणूनच

 वेडयावाकडया रेषांचे चित्र बनले


तुम्ही होतात म्हणून

जग वाचले 

आणि तुम्ही होतात म्हणूनच

जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहिलो


तुम्ही होतात म्हणून

विवेकी आणि सृजन झालो

आणि तुम्ही होतात म्हणूनच सामान्यातही आम्ही

असामान्य बनलो

                          Written by me

                           रुपाली सोनवणे

                        

No comments:

Post a Comment

  शिवाजी महाराज  " माझ्या आदर्शाला तुम्ही मंदिरात ठेऊ नका त्याला देव म्हणून पुजू नका ज्याने मला पंख दिले ते पंख असे चार भिंतीच्या गाभाऱ...