निःशब्द
(समर्पित जनता कर्फ्यु )
आज सारेच निःशब्द होते
कावळ्याच्या कावकावाशिवाय
आणि चिमण्यांच्या चिवचिवाशिवाय
उभ्या आसमंतात दुसरे काहीच नव्हते
आज प्रत्येक जात अन प्रत्येक भाषा निःशब्द होती
एकमेकांचे वैरी झालेली ही माणसे निःशब्द होती
आकाशात पक्षी मुक्त तर माणूस मात्र
आपल्याच घरात कैदी होता
झाडेही निःशब्द होती
का? ती माणसासाठीच प्रार्थना करीत होती
ज्यांचे आम्ही संहारक झालो तीच आमची
तारक बनू पाहत होती
आज या मुक्यांचा किलबिलाट
माणसांच्या आवाजापेक्षाही मोठा झाला होता
त्यांचीच घरटे मोडणारा माणूस आज सगळ्यालाच
पारखा झाला होता
माणसाला या कोरोनाने अंताची चाहूल दिली
आता तरी जागा हो म्हणून दृष्टी दिली
खरेच तो हे करेल का
जगा आणि जगू दया हा मंत्र जपेल का?
रुपाली सोनवणे
No comments:
Post a Comment