रामजी आंबेडकर
यलगार तुझा हा ध्यास तुझा
अंतरीची आग जीवाचा प्राण तुझा
भिवा तुझा हा उद्याचा सूर्य तुझा
ओळखीले ज्या हिऱ्याला तू सोनार असा
तू कणा तू आधार
तू कष्टकऱ्याचा हात
तू धगधगती ज्वाळा
तू पेटती मशाल
तू मेलेल्यांचा श्वास
अन उद्याची तळपती तलवार
तू भिवाच्या हृदयाचा ध्यास
अन फक्त तूच आमच्या बापाचा बाप
हा पहिला अन अखेरचा जोहार
मायबाप तुजला
स्विकार येथूनच
हा भावपूर्ण सलाम तुजला.
रुपाली रा. सोनवणे
No comments:
Post a Comment