Friday, 2 August 2024

 शिवाजी महाराज 


" माझ्या आदर्शाला तुम्ही मंदिरात ठेऊ नका

त्याला देव म्हणून पुजू नका

ज्याने मला पंख दिले ते पंख असे चार भिंतीच्या गाभाऱ्यात बसवून छाटू नका


शिवाजी देव नाही तो आहे महापुरुष,

ती आहे तळपती तलवार,

ती आहे ज्वाला,

ती आहे क्रांतीची मशाल


ही मशाल तेवत ठेवा तुमच्या माझ्या मनात

जशी माझ्या राजाने नष्ट करू पाहिली जातीयता,

जशी माझ्या राजाने नाकारली गुलामगिरी

तसे तुम्हीही व्हा निर्भीड आणि निर्भीस्त 


शिवाजी दिनदुबळ्यांचा राजा होता,

आयाबहिणींचा मायबाप होता,

दुश्मनांचा कर्दनकाळ होता

भुकेल्या पोटाचा घास होता

तळपता सूर्य होता 


तसे तुम्हीही बना

बंद करा एकमेकांचे पाय खेचणे 

धुडकारून द्या जातीची कवाडे आणि नाकारा सारीच गुलामगिरी 

फेकून टाका अंधश्रद्धेची जळमटे


शिवबा हा कधीच  मरत नसतो

तो कायमच जिवंत राहतो

तुमच्या आणि माझ्यात मनात 

प्रेरणा बनून


तेव्हा माझ्या महाराजाला महाराजच राहू द्यात

त्याला देव म्हणून गुदमरवू नका

त्याला मुक्तीदाताचं राहू द्यात

या साऱ्या मानवतेचा ''


                 Written by me

              Rupali Sonawane

No comments:

Post a Comment

  शिवाजी महाराज  " माझ्या आदर्शाला तुम्ही मंदिरात ठेऊ नका त्याला देव म्हणून पुजू नका ज्याने मला पंख दिले ते पंख असे चार भिंतीच्या गाभाऱ...