मुक्तिदाता - जोतिबा आणि साऊ। "
जिथं बंधनाला स्वातंत्र्य म्हणून जपलं गेलं जिथं चुल आणि मुल हे स्त्रीयांसाठी विश्व ठरवलं गेलं जिथं अन्यायाला न्याय म्हणून मिरवलं गेलं जिथं सत्याला मूठ माती दिली गेली जिथं विधवांना व्याभिचारी म्हणून नाकारलं गेलं जिथं स्त्रीला उपभोग्य वस्तू मानलं गेलं अशा काळाला वाचा फोडली ती माझ्या जोतिबा आणि साऊनी स्त्रीला गुलामगिरीतून मुक्त करुन तिच्या दासत्वाची कबर बांधली ती माझ्या जोतिबा आणि साऊनी। भिडे वाड्यात शाळा काढून तिला रणरागिनी ज्वाला बनविली ती माझ्या जोतिबा आणि साऊनी। अशा स्त्री जातीच्या मुक्तिदात्यांना स्त्रीला माणूसपण बहाल करणाऱ्या जोतिबा आणि साऊला कोटी कोटी धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
No comments:
Post a Comment